मधमाशी : पर्यावरणातील परिस...
---------------
जागतिक मधुमक्षिका दिन विशेष…
----
- विनोद कामतकर
9850434353
---
पर्यावरणातील पशु, प्राणी, पक्षी व किटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पर्यावरणाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात. आपल्यास लाभलेल्या जैविक संपत्तीमध्ये मधमाशांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मधमाशी हा शत्रू किटक नसून तो मित्र किट आहे, याची जाणीव सर्वांना असणे महत्वाचे असून त्या पर्यावरणातील परिस आहेत. झाडांची बेसुमार तोड, कीटकनाशकांचा अतिरेक वापरामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी २० मे जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा होतो. मधमाश्या, वनस्पती, पिकं यांच्यातील सहजीवन सगळ्यांसाठी कल्याणकारी असते. मधमाश्यांच्या फुलातील हालचालींमुळे म्हणजे परागीकरणाच्या क्रियेमुळे फलधारणा घडते. सपुष्प वनस्पतींचे अस्तित्व मधमाशांवर विसंबून असते. आपल्या जेवणातील तीन घासांपैकी एक घास मधमाशअयांमुळे मिळतो. त्यांच्याकडून आपल्याला पौष्टिक मध मिळतो.
शास्त्रीय पद्धतीने मधमाशापालन व्यवसाय करून मधाशिवाय मेण, पराग, रॉयल जेली (राजान्न) मिळते. त्याचा वापर निरोगी, दीर्घायुष्यासाठी करु शकतो. मधमाशांमुळे पिकांमध्ये त्वरीत परागीकरण घडते. पीक, फलोत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होते. कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. शेत-शिवारातील मोहोळ म्हणजे समृद्धी, शुभशकुन समाजावे. त्यामुळे मधमाशी हरितक्रांतीच्या शिल्पकार असून पर्यावरणातील अन्न साखळ्या सबलीकरणासाठी कारणीभूत ठरतात. त्यांचा क्वचित प्रसंगीचा डंख गुणकारी ठरु शकतो. त्यांचे विष सुद्ध काही दुर्धर आजारासाठी गुणकारी ठरते.
------दत्त महाराजांचे गुरु....
श्री दत्त महाराजांनी २४ गुरु केले. त्यामध्ये मधमाशीला त्यांनी गुरु केले आहे. मधमाशी अनेक अडचणींना सामना करून मध गोळा करते. तोच मधसाठा तिच्यासाठी घातक ठरतो. कुणाच्या दृष्टीस पडू नये अशा कड्या-कपारीमध्ये किंवा उंच ठिकाणी मधमाशी पोळे बांधून त्यामध्ये मधाचा साठा करते. पण, मध पळविणारे लोक अचूकपणे तो मध पळवितात. त्याप्रमाणे आवश्यकतेहून जास्त संचय करणे योग्य नाही, असा संदेश दत्तमहाराजांनी गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिला आहे.
---
माणसांच्या चुकांमुळेच..
.
मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, वटवाघूळ, साप पक्षी असेच सर्वच जीव शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करतात. यात मधमाश्या आघाडीवर असतात. त्यांचे महत्व अबाधित आहे. फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असता. त्याशिवाय दुसरे कीटक हे काम करु शकत नाहीत. पूर्वी मधमाशांची पोळी प्रामुख्याने काटेरी झाडीवर असायची. पण, अलीकडच्या काळात ही पोळी जांभूळ, आंबा, नारळ झाडांसह घरात, भिंतींवर दिसू लागली आहेत. माणसांच्या चुकांमुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवास बदल केलाय, तो फक्त माणसांच्या चुकांमुळेच.
----
मधमाशीपालन कृषिपूरक व्यवसाय
मधमाशी पालन हा चागंला कृषिपूरक व्यवसाय आहे. खादीग्रामोद्योग महामंडळ, महाबळेश्वर येथील मधुमक्षिका पालन केंद्रातर्फे त्याचे प्रशिक्षण देण्यात येते. याद्वारे चांगला रोजगार मिळतो. डाळींब व वेलवर्गीय प्रजातींच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मधमाशी खूप महत्वाचे माध्यम आहे. मधमाशी पेट्या भाडोत्री देण्याचा व्यवसायाद्वारे रोजगार चागंला रोजगार मिळतो, असे प्राणीशास्त्रच्या अभ्यासिका प्रा. रश्मी माने यांनी सांगितले.
------
‘मधमाशी मित्र’ संकल्पनेची गरज..
मधमाशांचे पोळं जाळण्याचा अघोरी प्रकार अनेक ठिकाणी घडताेय. मोठी झाडं नसल्याने मधमाशी शेत-शिवारातून शहराकडे येत आहेत. शास्त्रीय पद्धतीने मधमाशांना त्रास होऊ न देता पोळे काढण्याचे प्रशिक्षणाची गरज आहे. प्राणीमित्र, सर्प मित्रांप्रमाणे आता ‘मधमाशी मित्र’ या संकल्पना कृतीशील होण्याची गरज असल्याचे, पर्यावरण स्नेही मीना मोकाटे यांनी सांगितले.
-----
मधमाशी विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन मधमाशाच करु शकतात. त्यांचे प्रमाण कमी झाल्यास आपल्या खाद्यापदार्थताली अनेक घटक, वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होऊन अन्नधान्याचा तुटवडामुळे भूकबळी वाढण्याचा धोका आहे. मधमाशांचे महत्व वेळी आेळखून त्यांचे संरक्षण, संवर्धन आवश्यक. स्थानिक वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे. सर्वच कीटकांना शत्रू नाहीत. रासायनिक औषधांचा अतिरेक बंद व्हावा. शाश्वत शेतीकडे वेळीच न वळणे हाच शेवट पर्याय आहे, असे पर्यावरणशास्त्र अभ्यासिका प्रिया फुलंब्रीकर सांगतात.



Very good
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete