निष्पाप जीवांचा अंत....--------------
-विनोद कामतकर, सोलापूर
----
चारही दिशांनी येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराज्य रस्त्यांनी सोलापूरशहर जोडलेले आहे. रस्त्यांमुळे शहराची प्रगती हे वास्तव आहे. पण, त्याच रस्त्यांवरून येजा करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अनेक निष्पाप वन्यजीव चिरडले जातात. दरवर्षी त्यांची संख्या शेकडोंच्या पुढे आहे. माणसांबाबत संवदेनशील असणारी यंत्रणा मुक्या प्राण्यांबाबत मात्र किती अंसवेदशील आहे, हे दरवर्षी घडणाऱ्या दुर्घटनांच्या वाढत्या आकडेवारून स्पष्ट होते. ना चिंता ना काळजी, अशीच स्थिती वाहनाचालकांची व वन्यजीवांसाठी कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचीही आहे.
पंढरपूर, अक्कलकोट व तुळजापूर या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे सोलापूरला दरवर्षी हजारो भाविक येतात. त्यांच्यासह स्थानिक वाहनांचा भरधाव वेग सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर लांडगा, कोल्हा, साळींदर, उदमांजर, मसण्यामांजर, मुंगूस, काळवीटांवर जिवावर बेततोय. वन्यजीव अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून गवताळ माळरांचा जिल्हा अशी खास आेळख असलेल्या सोलापूरात माळढोक पक्ष्यांबरोबर जिल्ह्यातील पाणवठ्यांवर अनेक दुर्मिळ व स्थलांतरीत पक्षी येतात. देशातील सुमारे ६८ पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे, वटवाघूळ, लांडगा, तरस, कोल्हे या वन्यजीवांसह अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. जैवविवधेतने संपन्न असलेल्या सोलापूरातील वन्यजीवांना वाढत्या वाहतुकीची दृष्ट लागल्याचे चित्र आहे. वेगाने रस्ता आेलांडता न आल्याने साप, सरडे, उदमांजर, रानमांजर, घोरपड, साळींदर रोज प्राण गमावत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोलापूर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर ) येथे वाहनाच्या धडकेने एक कोल्हा व एक रानमांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर होटगीस्टेशन परिसरात एक काळवीट वाहनाच्या धडकेने जखमी झाले. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात फिरणाऱे वन्यजीवांना वाहनांचा मोठा धोका आहे.
माळरानावरील ‘वाघ’ही चिरडून ठार
वाघ या राष्ट्रीय प्राण्यांबाबत शासन व प्रशासनासह सर्वच घटक फारच जागरुक आहेत. पण, माळरानावरील ‘वाघ’अशी उपाधी असणारा लांडगा बाबत कमालाची अनास्था आहे. देशात झपाट्याने कमी होत असलेल्या प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. अक्कलकोट रस्त्यावर वळसंग परिसरात दीड वर्षांपूर्वी दोन लांडग्यांचा मृत्यू झाला.
नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केलचे सर्व्हेक्षण
येथील नेचर काॅन्झर्व्हेशन सर्केलने अक्कलकोट, पुणे, तुळजापूर, मंगळवेढा, बार्शी रस्त्यांच्या दुतर्फो आढळणारे वन्यजीव व त्यांचे अपघात या विषयावर गेल्या चार वर्षांपासून (सन २०१२ पासून) सर्व्हेक्षण केले आहे. तर, विजापूर- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वन्यजीव व अपघातांचे सर्वेक्षण रानवेधन निसर्ग मंडळाने केले. दोघांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून वन्यजीवांबाबतची अनेक धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या परिसरात अत्यंत दुर्मिळ असणारा मलकोहा पक्षी अक्कलकोट रस्त्यावर गेल्यावर्षी मृत्यूमुखी पडल्याचे आढळले.
आठ प्रकारच्या सापांचा समावेश
रस्त्यावरील भरधाव वाहनाखाली आठ पेक्षाजास्त जातीचे साप चिरडले गेलेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार या विषारी जातीसह मांडूळ, धामण, गवत्या, तस्कर, धुळनागीन या बिनविषारी सापांचा समावेश आहे.
एकाच दिवशी १२८ फुलपाखरं ठार
किटकशास्त्र विषयाचा अभ्यासक राघवेंद्र वंजारी व सागर सुरवसे या तरुणांनी गेल्यावर्षी (सन २०१५-१६) पावसाळ्यात बाळे ते मार्केटयार्ड या रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेल्या फुलपाखरांचे सर्व्हेक्षण केले. त्यामध्ये एकाच दिवशी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२८ फुलपाखरं मृत्यूमुखी पडल्याचे आढळले. त्यामध्ये २३ प्रकारच्या फुलपारखांच्या प्रजातींचा समावेश होता. लाईन प्रजातीचे फुलपाखरांची संख्या सर्वांधिक होती. रस्त्यांवर चिरडणाऱ्यामध्ये ढालकीडा,ड्रॅगन फ्लाय.
वन्यजीव ठराविक ठिकाणीच रस्ता आेलांडतात
बहुतांश वन्यजीव ठराविक ठिकाणाहून येजा करतात किंवा रस्ता आेलांडतात, असे अभ्यासकांच्या निष्कर्षातून पुढे आले. कळपातील प्रमुख लांडगा किंवा कोल्हा पुढे निघाल्यानंतर त्याच्या मागोमाग सर्वजण निघतात.प्रमुख नर ज्या रस्त्याने येजा करतो, त्याच रस्त्याने कपळातील इतर प्राण्यांची येजा असते. जवळचा दुसरा मार्ग असला तरी त्याच मार्गाचा वापर करतात.त्यामुळेच रस्ता आेलांडताना भरधाव वाहनाची धडक त्यांना बसते.त्यामुळे रस्ता दुतर्फो वन्यजीवांच्या छायाचित्रांसह त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृतीचे फलक लावल्यास थोडीफार जागृती होईल.
स्वयंसेवी संस्थांची धडपड
रस्ते अपघात जखमी झालेल्या वन्यजीवांवर उपचारासाठी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केल संस्था, पीपल फॉर अॅनीमल,अरिहंत यासह काही स्वयंसेवी संस्था, वन्यजीव प्रेमी मदतीसाठी पुढाकार घेतात. नेचर कॉन्झर्व्हेशनचे सदस्य रस्त्यांवर एखादा वन्यजीव,पक्षी मृत्यूमुखी झाल्याचे दिसताक्षणी मृतदेह बाजूला काढून ठेवतात.
-----------------
हे हवेत उपाय
- वन्यजीवांचा अधिवास असलेल्या परिसरात त्यांच्या छायाचित्रांसह जागृती फलक लावणे
- फुलपाखरांच्या संवर्धनासाठी ते ज्या झाडांवर अंडी घालातत ते संरक्षित ठिकाणी लावून जोपासना करणे
- नवे राष्ट्रीय महामार्ग करताना वन्यजीवांना रस्ता आेलांडण्यासाठी अधिवासाच्या भागात छोटा पूल किंवा मोरी बांधणे
- अभयारण्य प्रमाणे रस्त्यांवर सावधनतेचे फलक
---------------------------------------------