*वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी 'हॅलो फॉरेस्ट'*
=============================
*_१९२६ या 'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
=============================
_वनांचा र्हास आणि वन्यजीवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी 'हॅलो फॉरेस्ट' ही 'टोल फ्री 'हेल्पलाईन सुरू होणार आहे. आता एका 'क्लिक'वर वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन तसेच नागरिकांना थेट समस्या, तक्रारी मांडता येतील. राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
=============================
*_१९२६ या 'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
=============================
_वनांचा र्हास आणि वन्यजीवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी 'हॅलो फॉरेस्ट' ही 'टोल फ्री 'हेल्पलाईन सुरू होणार आहे. आता एका 'क्लिक'वर वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन तसेच नागरिकांना थेट समस्या, तक्रारी मांडता येतील. राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचे जाळे गाव-खेड्यात
पसरविण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. विशेषत: वने, वन्यजीवांचे संरक्षण आणि
संवर्धन याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ११ प्रादेशिक, तर
चार वन्यजीव विभागांना लक्ष्य करताना शासनाने वनांची समृद्धी आणि
वन्यपशुंचे संवर्धन याविषयी कृती आराखडा तयार केला आहे. 'हॅलो फॉरेस्ट'या
हेल्पलाईनबाबत वनाधिकारी, वनकर्मचार्यांना माहिती मिळावी, यासाठी
राज्यभरात प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी २१
नोव्हेंबर रोजी अमरावतीत वनकर्मचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात
नागरिकांचे सहकार्य घेण्याविषयी सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
*_पाच प्रकारच्या क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत विविध
सुविधा, समस्या जाणून घेतल्या जातील. या हेल्पलाईनमध्ये जंगल ते मंत्रालय
असा प्रवास राहणार आहे. जंगलात लागणारी आग, वन्यपशुंची शिकार, अवैध
वृक्षतोड, वनविभागातील व्यापार,जंगलांची माहिती आदी बाबींचा समावेश राहणार
आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक,
मुख्यवनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशी
सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ज्या वनपरिसरातून ही माहिती मिळाली त्या
भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाईलवर 'मॅसेज'द्वारे ती
पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे._*
_वनविभागाच्या वेबसाईटवर वनाधिकार्यांचे मोबाईल क्रमांक आणि
दैनंदिन गोषवारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या हेल्पलाईनचा रोज किती
जणांनी वापर केला, हे मंत्रालयातही बघता येणार आहे. या हेल्पलाईनमुळे
जंगलांचा होणारा र्हास आणि वन्यपशुंच्या शिकारीवर नक्कीच आळा बसण्याची
शक्यता वर्तविली जात आहे. 'टोल फ्री' क्रमांकामुळे नागरिकांना वने,
वन्यजीवांबाबत आता थेट तक्रारी, समस्या मांडता येतील. तांत्रिकदृष्ट्या
'हॅलो फॉरेस्ट' सुसज्ज झाले आहे. केवळ शुभारंभाची औपचारिकता शिल्लक आहे._
*_'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
■ *या हेल्पलाईनचा 'टोल फ्री' क्रमांक १९२६ असून २४ तास ही
सेवा सुरू राहणार आहे. मुंबईत या क्रमांकाचा नियंत्रण कक्ष राहणार आहे. पाच
क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
अशी देता येईल तक्रार*
■ *शून्य क्रमांक - आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण*
■ *शून्य क्रमांक - आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण*
■ *एक क्रमांक - ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी, तीन कोटी वृक्ष लागवड*
■ *दोन क्रमांक - वनविभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदी.*
■ *तीन क्रमांक - वनविभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदूपत्ता, सागवान*
■ *चार क्रमांक - जंगलाबाबत माहिती, शेती नुकसान,वन्यप्राण्यांवर हल्ला आदी.*

No comments:
Post a Comment