Sunday, April 30, 2017

श्रीराम वंदना

शौनक अभिषेकींच्या आवाजातील श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं .
नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय र ाम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।🙏🙏🙏🙏🙏🙏

*वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी 'हॅलो फॉरेस्ट'*

*वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी 'हॅलो फॉरेस्ट'*
=============================
*_१९२६ या 'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
=============================
_वनांचा र्‍हास आणि वन्यजीवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी 'हॅलो फॉरेस्ट' ही 'टोल फ्री 'हेल्पलाईन सुरू होणार आहे. आता एका 'क्लिक'वर वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन तसेच नागरिकांना थेट समस्या, तक्रारी मांडता येतील. राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचे जाळे गाव-खेड्यात पसरविण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. विशेषत: वने, वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ११ प्रादेशिक, तर चार वन्यजीव विभागांना लक्ष्य करताना शासनाने वनांची समृद्धी आणि वन्यपशुंचे संवर्धन याविषयी कृती आराखडा तयार केला आहे. 'हॅलो फॉरेस्ट'या हेल्पलाईनबाबत वनाधिकारी, वनकर्मचार्‍यांना माहिती मिळावी, यासाठी राज्यभरात प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी अमरावतीत वनकर्मचार्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात नागरिकांचे सहकार्य घेण्याविषयी सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
*_पाच प्रकारच्या क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत विविध सुविधा, समस्या जाणून घेतल्या जातील. या हेल्पलाईनमध्ये जंगल ते मंत्रालय असा प्रवास राहणार आहे. जंगलात लागणारी आग, वन्यपशुंची शिकार, अवैध वृक्षतोड, वनविभागातील व्यापार,जंगलांची माहिती आदी बाबींचा समावेश राहणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक, मुख्यवनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशी सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ज्या वनपरिसरातून ही माहिती मिळाली त्या भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाईलवर 'मॅसेज'द्वारे ती पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे._*
_वनविभागाच्या वेबसाईटवर वनाधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक आणि दैनंदिन गोषवारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या हेल्पलाईनचा रोज किती जणांनी वापर केला, हे मंत्रालयातही बघता येणार आहे. या हेल्पलाईनमुळे जंगलांचा होणारा र्‍हास आणि वन्यपशुंच्या शिकारीवर नक्कीच आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'टोल फ्री' क्रमांकामुळे नागरिकांना वने, वन्यजीवांबाबत आता थेट तक्रारी, समस्या मांडता येतील. तांत्रिकदृष्ट्या 'हॅलो फॉरेस्ट' सुसज्ज झाले आहे. केवळ शुभारंभाची औपचारिकता शिल्लक आहे._
*_'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
■ *या हेल्पलाईनचा 'टोल फ्री' क्रमांक १९२६ असून २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे. मुंबईत या क्रमांकाचा नियंत्रण कक्ष राहणार आहे. पाच क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशी देता येईल तक्रार*

■ *शून्य क्रमांक - आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण*
■ *एक क्रमांक - ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी, तीन कोटी वृक्ष लागवड*
■ *दोन क्रमांक - वनविभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदी.*
■ *तीन क्रमांक - वनविभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदूपत्ता, सागवान*
■ *चार क्रमांक - जंगलाबाबत माहिती, शेती नुकसान,वन्यप्राण्यांवर हल्ला आदी.*


पक्षीपर्यटन केंद्रासाठी सोलापूरचा प्रस्ताव शासनाकडे सादर

पक्षीपर्यटन केंद्रासाठी सोलापूरचा प्रस्ताव शासनाकडे सादर
- विनोद कामतकर
-------
स्मार्टसोलापूरला पर्यटनाचा अंग देण्याचे प्रयत्न अग्रस्थानी आहेत. त्यात शिक्षण, आरोग्य आणि उद्योग यांचा समावेश असला तरी, पर्यावरणाला सोडून या बाबी करता येणार नाहीत. भरतपूर (राजस्थान) हे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्यासाठी प्रसिद्ध असले तरी तिथल्या पेक्षाही अधिक या सोलापूर नगरीत पहावयास मिळतात. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने पक्षी पर्यटन केंद्र विकसीत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे.
धार्मिक पर्यटनासाठी सोलापूरात संपूर्ण राज्यासह व देशभरातून नागरिक येतात. चादर, टॉवेल, कडक भाकरी अन्् शेंगाची चटणीचे सोलापूर अशीही आेळख आहे. त्याच जोडीला पक्षी पर्यटनाचे उत्कृष्ट ठिकाण अशीही सोलापूरची नवी आेळख वाढत आहे. धार्मिक बरोबरच निसर्ग पर्यटनासाठी सोलापूरात पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तर्फे हालचाली सुरु आहेत.
सोलापूरच्या अवतीभोवती एक धरण, तीन नद्या व ११४ छोटी-मोठे तलाव आहेत. २८४ प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरीत पक्षी जिल्ह्यात आढळतात. देशातील अतीदुर्मिळ माळढोक पक्षीचे अभयारण्य आहे. त्याचबरोबर लांडगा, कोल्हा, खोकड यासह काळवीट असे माळरानावर आढळणारे वन्यजीव सोलापूरात आढळतात. येथील पाठवण्यांवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्षी येतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ (कै.) सलीम अली यांनी सोलापूरला स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर अशी उपाधी दिली होती.
जिल्हा प्रशासनाने त्यांच्या वेबसाईटवर पक्षीपर्यटन केंद्राबाबतची माहिती दिली आहे. येथील पक्षीमित्र डॉ. व्यंकटेश मेतन यांनी तो प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. शहरालगतचा हिप्परगा व मध्यवर्ती ठिकाणचे संभाजी तलाव हे पक्षीपर्यटनाचे विशेष केंद्र करावे, असे त्यामध्ये नोंदविले आहे. पक्षी पर्यटन केंद्र म्हणून सोलापूर विकसीत झाल्यास पर्यटकांचा आेघ सुरु होईल. त्यानिमित्ताने सोलापूरच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास निश्चित हातभार लागेल.
----

सोलापूरातील पर्यटन स्थळ


- विनोद कामतकर
---------
कर्नाटक व तेलंगण राज्याच्या सीमालगत असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यात धार्मिक पर्यटन व निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येतो.
शहरापासून ११० किलोमीटर अंतरावरील अकलूज (ता. माळशिरस) येथील किल्यात शिवसृष्टी उभारण्यात आलीय. त्याच परिसरातील आनंदी गणेश, सयाजीराजे वॉटरपार्क आहे. त्याठिकाणी राहण्यासाठी चांगले लॉज व हॉटेल उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे दैवत असणारे पंढरपूर अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर  त्या शेजारील गोपाळपूर, शहरातील विविध मठ मंदिर प्रेक्षणीय आहेत. देशातील अतीसंकटग्रस्त प्रजातीमधील माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे अभयारण्य आहे. लांडगे, खोकड, काळवीटांसह अनेक स्थानि व स्थलांतरीत पक्षी-प्राण्यांचा अधिवास येथे आहे. येथे वन्यजीव विभागाचे विश्रामगृह आहे.
शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट हे अध्यात्मिक क्षेत्र आहे. त्या शेजारील शिवपुरी येथे अग्निहोत्र चालते. सोलापूर शहरामध्ये ग्रामदैव शिवयोगी सिद्धरामेश्वररांचे मंदिर आहे. मंदिराच्या भोवताली तलाव, जवळच भुईकोट किल्याची तटबंदी असे सुंदर अध्यात्मिक स्थान आहे. थोरमानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आहे. शहरापासून अवघ्या दहा किलोमीटवर सिद्धेश्वर वनविहार हे राखीव वनक्षेत्र आहे. शहराच्या भोवती दोनशे हेक्टर राखीव वनक्षेत्र असणारे मुंबईनंतर सोलापूर हे राज्यातील दुसरे शहर आहे. या ठिकाणी कोल्हा, खोकड, मोर, घोरपड, ससे यासह अनेक स्थानिक स्थलांतरीत पक्षी आढळतात. दुर्मिळ आैषधी वनस्पती येथे आढळतात. शहरापासून ३५ किलोमीटरवर सीना व भीमा नदीच्या संगमावर हत्तरसंगकुडल हे अध्यात्मिक पर्यटनस्थळ आहे. मराठी भाषेतील पहिला शीलालेख येथे आढळला असून उत्खननामध्ये प्राचीन हरिहरेश्वर मंदिर सापडले. येथील बहुमुखी शिवलिंगावर ३६० छोटे शिवलिंग आहेत, हे दुर्मिळ ठिकाण आहे. शहराच्या अवतीभोवती कृषीपर्यटन केंद्र आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या पर्यटन केंद्रांमध्ये हुरडापार्टी होतात. सोलापूराची शेंगा चटणी व ज्वारीची कडक भाकरी येथील बहुतांश हॉटेल, ढाबे व दुकानांमध्ये सहज  मिळतात.
---------

प्राणीगणनेसोबत पर्यटन, सर्वसामान्यांचा सहभाग वाढवणार

१० ११ मे रोजी वैशाख पौर्णिमेला होणार गणना;
मचानांसाठी घेणार शुल्क, मचानांची आॅनलाईन बुकींग २० एप्रिलपासून सुरू होणार
सोलापूर:
सर्वसामान्यांमध्येवनसंपदेसह वन्य जीवांबद्दल आपुलकी िनर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या उन्हाळी प्राणीगणनेसाठी सर्वसामान्यांसोबतच वन्यजीवप्रेमींना मचानांसाठी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. यंदा १० ११ मे रोजी वैशाख पौर्णिमेला प्राणी गणना होणार मेळघाटात ५०० व्यक्तींना व्याघ्र गणनेसाठी प्रवेश िदला जाणार अाहे.
या प्राणीगणनेत सर्वसामान्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वनविभागाचे जोरासोरात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता वनविभागाने पर्यटनाचे स्वरूप िदले आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला व्याघ्र गणना केली जाते. वनांमधील पानवठ्यांवर केल्या जाणाऱ्या या प्राणी गणनेच पद्धत आता जुनी झाली आहे. लोकांमध्ये वनांची माहिती व्हावी, वन्यजीवांच्या प्रत्यक्ष दर्शनाने सर्वसामान्यांना आनंद िमळेल. याच कारणास्तव राज्यभरात वन विभाग प्राणी गणनेसाठी कोणतेही शुल्क घेत नाही. यंदा केवळ मेळघाट पेंच येथे ५०० रु. शुल्क वन्यप्रेमींकडून घेतले जाणार आहे. सहभागी होणाऱ्यांना दोन वेळचे भोजन, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, टी शर्ट, बॅग पुस्तके वन विभागाद्वारे िदली जातील, अशी माहिती उपवन संरक्षक हेमंत मीना यांनी िदली.
वनविभाग ५०० वन्यप्रेमींना प्राणी व्यवस्थित बघता येतील, याची सोय अर्थात मचान बांधणार आहे. तसेच तेथवर वन्यप्रेमींना पाेहोचवण्याची जबाबदारी वन्यप्रेमींची राहणार आहे.
--
मेळघाटात २० जागी उभारणार मचान
प्राणीगणनेसाठीजिल्ह्यात २० जागी मचान उभारले जाणार आहेत. या मचानांवर बसून प्राणीगणना केली जाईल. चिखलदऱ्यात ३० जणांसाठी, कोहा येथे ४० जणांसाठी, तारुबांधा येथे २०, ढाकणा येथे २०, हरिसाल येथे ३०, खानगडा येथे १०, कुंड येथे ३०, संमाडोह येथे ४५, रायपूर येथे २५, जरिदा येथे ३५, हाथरू येथे १०, चौराकुंड येथे ३५, बोथा येथे ३०, शहानूर येथे १५, गुल्लरघाट येथे ३०, वाणा येथे २०, सोनाला येथे ३०, शिवपूर येथे १६, पोहरा येथे १५, बघा येथे १५ वन्यप्रेमींसाठी मचान उभारले जाणार आहे. या मचानांची आॅनलाईन बुकींग २० एप्रिलपासून सुरू होणार आहे.
----

वनविभाग यंदाच्यावर्षी लावणार सहा लाख झाडं

वनविभाग यंदाच्यावर्षी लावणार सहा लाख झाडं
सोलापूर - वन विभागाच्या वतीने मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. यंदाच्यावर्षीही वन विभागाकडून झाडे लावण्यात येणार आहेत. यावर्षी सहा लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने एक जुलै रोजी राज्यभर वृक्ष लागवडीचे महाअभियान हाती घेतले होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्यात आली. जागतिक तापमानवाढ समस्येच्या पार्श्‍वभूमीवर या मोहिमेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, संघटनांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होत हजारो ठिकाणी वृक्ष लागवड केली होती. 
वन विभागाकडूनही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. यात श्री सिद्धेश्‍वर वन विहारात एक हजार २१४, भंडारकवठे येथे २४ हजार, कोरेगाव येथे ४० हजार, मेंढापूर येथे ५० हजार, हुलजंती येथे २४ हजार, बार्डी येथे १८ हजार, वेळापूर येथे ४२ हजार, शिंगोर्णी येथे १२ हजार, नातेपुते येथे २२ हजार २२०, पिलीव येथे १८ हजार, धर्मपुरी येथे १२ हजार, लोणंद येथे १८ हजार, गिरवई येथे ३० हजार, चांदापुरी येथे २४ हजार, तरंगफळ येथे ३६ हजार, कटफळ २४ हजार, बागलवाडी येथे ३९ हजार २००, मेडशिंगी येथे १९ हजार, यलमार मंगेवाडी येथे १३ हजार ८०० अशी एकूण चार लाख ५९ हजार झाडे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त झाली होती. 
यात भर घालून वन विभागाने पाच लाख तीन हजार ४३४ झाडे जिल्हाभरात लावली होती. यावर्षी वन विभागाने सोलापूर जिल्हाभरात तब्बल सहा लाख झाडे लावण्याचा निश्‍चय केला आहे.
----
आकडे बोलतात...
वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त रोपे : चार लाख ५९ हजार
वृक्षारोपणाची संख्या : 
पाच लाख तीन हजार ४३४
वृक्षारोपणात सहभागी यंत्रणा : १८ हजार ९१३

जैवविविधतेच्या संवर्धनाकडे सोईस्कर दुर्लक्ष

 जैवविविधतेच्या संवर्धनाकडे सोईस्कर दुर्लक्ष
विनोद कामतकर । सोलापूर
९७६५५६२८६२
जैवविवधता जनजागृती, गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याचा आदेश आहे. पण, प्रत्यक्षात त्याबाबतही कार्यवाहीच होत नसल्याने गावकऱ्यांना ‘जैवविविधता’ म्हणजे काय? यासह समित्यांही फारशी माहिती नाही. गाव ते जिल्हापातळीवर समितीच अद्याप अस्तित्वात नसून  वनविभाग व जिल्हा प्रशासनाने काहीच ठोस प्रयत्न केले नसल्याने केवळ कागदोपत्रीच कामकाज सुरु आहे.

अवतीभोवती असलेल्या जैवविवधेतची लोकसहभागाद्वारे माहिती एकत्रित करणे, त्याचे स्वामित्व (पेटंट) मिळवणे, जैविकदृष्टीकोनातून परिसराच्या शाश्वत विकासासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती, जैविक विविधतांची अचूक नोंद करणे, शासकीय निधी, अनुदान खर्चाचा योग्य विनीयोग करण्यासाठी पाच वर्षांपर्यंतचा कार्यकाळ असणारी समिती जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र व राज्याने घेतला.
२२ मे जैवविवधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जैवविविधता कायदा अस्तित्वात येऊन १४ वर्षांचा कालावधी उलटला. संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरावर त्या समित्या स्थापन करण्याचा अध्यादेश राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने गेल्यावर्षी दोन मे रोजी  काढला. या समित्यांच्या माध्यमातन गावोगावी जैविविधतेचा वारसा आणि स्त्रोत जतन, संवर्धनाचे काम सोपे होण्यास मदत होणार आहे. पण, प्रत्यक्षात आदेश व धोरण निश्चित झाल्यानतंरही त्याबाबतही कृती करण्याबाबत प्रशासनानचा हलगर्जीपणा आहे.
---
नियम अन् धोरण काय?
जैवविवधता समितीच्या वर्षभरातून किमान चार बैठका झाल्याच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी त्या समितीचे सचिव असतील. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ झाल्यानंतर त्या समितीची फेर निवड करण्यात येईल.”
---
जैैवविवधता समितीचे महत्व काय?
सभोवतालच्या सजीवांचे अनेकविध प्रकार असून जीवशास्त्रीय दृष्ट्या त्यास जैविवक विविधता म्हणातात. त्यामध्ये सजिवांच्या प्रजातींची विविधता, त्यामधील जनुकिय वेगळेपण, परिसंस्था विविधता यांचा समावेश असून सर्व सजीवांचे अस्तीत्व ऐकमेकांवर विसंबून अाहे. त्या जैविक विविधतेचा स्वतंत्र अभ्यास झालाच पाहिजे. त्यासाठी शासनाकडून मिळणारा निधी, इतरांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे स्वतंत्र लेखापरीक्षण झालेच पाहिजे. नोंदवहितील माहिती देणाऱ्याच्या नावाचा उल्लेख करावा, त्यामधील गोपनिय व महत्वाची माहिती सार्वजनिक पद्धतीने इतरांना देता येत नाही.
कोणत्याही उत्पादनामध्ये जैविक साधनांचा वापर करण्यापूर्वी जैवविवधता प्राधिकरणाची परवानी घेणे बंधनकारकक आहे. पण, कंपन्या त्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. बासमती तांदूळ, हळद यासारख्या वस्तू भारतामध्ये पारंपारीक काळापासून वापरण्यात येतात. पण, त्याचा स्वामित्व हक्क (पेटंट) इतर राष्ट्रांनी मिळवला. जागतिक पातळीवर स्वामित्वाचे खूप महत्व असते. आपल्याकडे अनेकांना जैविक गोष्टींची खूप चांगली माहिती असते. काहींना त्यामागील शास्त्रीय दृष्टीकोन, त्याचे महत्व याबाबतची कल्पना नसते. त्यासह इतर गोष्टी या माध्यमतून नोंदविण्यात येतील.
---
आपल्याकडे जैवविवधता संवर्धनासाठी चांगले कायदे आहेत. पण, गावकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आैषध, सौंदर्यप्रसाधन कंपन्या जैविवक संपत्ती आेरबाडतात. गावकऱ्यांच्या पारंपारिक माहितीच्या आधारे काही कंपन्यांनी स्वता:ची उत्पादने तयार  केलीत. काहींनी स्वत:चे पेटंट घेतली. गावकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी राज्य जैविविधता प्राधिकरण सक्रीय आहे. जैविक साधनसंपत्तीच्या व्यवसायिक वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी कृती आराखडा करण्याचा प्रयत्न प्राधिकरणाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांच्या मार्गदर्शन खाली सुरु आहे.
---
राज्यातीलल १२०० कंपन्यांना नोटिस
कोणत्याही उत्पादनामध्ये जैविक साधनांचा वापर करण्यापूर्वी जैवविवधता प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आे. मात्र, आत्तापर्यंत कंपन्यांनी दुर्लक्षच केले होते. त्या कंपन्यांशी संपर्क साधण्यात येत असून गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये सुमारे १२०० पेक्षा जास्त कंपन्यांना नोटिस पाठविल्या आहेत. नोटिसकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही कंपन्यांवर उच्च न्यायायलयात खटले सुरु आहेत.
---
जर्मन कार्पारेशनचे सहकार्य
जैवविवधता संवर्धन उपक्रमास जर्मन कॉर्पोरेशनचे आर्थिक सहकार्य आहे. पहिल्या टप्यातील या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व उत्तरखंड राज्यांची निवड झालीय. जर्मन कॉर्पोरेशनचे पदाधिारी, महाराष्ट्र जैवविविधता प्राधिकरण, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय व चेन्नई जैवविवधता प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये काही गावांमध्ये जनजागृती प्रशिक्षण वर्ग व कार्यशाळा घेण्यात येतील.
-------------------------------------
सोलापूरत दीड वर्षांपूर्वी कार्यशाळा
दीड  वर्षांपूर्वी सोलापूरातजाणीव जागृती कार्यशाळा घेतली होती.  प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंह, उपवनसंरक्षक सुभाष बडवे, राज्य जैवविविधता मंडळाचे तांत्रिक अधिकारी जी. एस. खांडेकर, वरिष्ठ संशोधक डॉ. राहूल मुंगीकर, आैषधीतज्ज्ञ विवेक येन्नरवार, एस. डी. गिरी आदी उपस्थित होते.
जैविविधताबाबत जाणीव जागृती वाढविण्यासाठी तालुकापातळीवर स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात येईल, सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात काहीच  हालचाली नाहीत.
----
गाव अन्् जिल्हास्तरीय समिती नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश आहेत. तसेच, जिल्हास्तरीय स्वतंत्र समिती आवश्यक आहे. प्रत्यक्षात एकही समिती नियुक्ती झाली नाही. मुख्य वनसंरक्षक सिंह म्हणाले,“पृथ्वीवरील जैवविवधतेवर माणसांचे अस्तित्व विसंबून आहे. संपूर्ण राज्यभरात पुढील दीड वर्षामध्ये २८ हजारांपेक्षा जास्त जैवविवधता समित्यांची स्थापना करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व १०२८ ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिकेत ती समिती नियुक्त असेल, त्यांनी स्पष्ट केले.  काही गावांमध्ये प्रयत्न झाले. पण, त्यास वनविभागाकडून मार्गदर्शन व सहकार्य मिळाले नाही.
-----------
वनविभाग फक्त ग्रीन आर्मित व्यस्त
जैववविधता समिती हे वनविभागाचे कार्य आहे, याचा विसर उपवनसंरक्षक कार्यालयास आहे. फक्त लाकूड बाजार, वनोपज नाका, अवैध कोळसा भट्टी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यास वनविभाग व्यस्त आहे. काही वनकर्मचारी नालाबांध, मातीबांध, खड्डे खोदाईच्या सोईस्कर पद्धतीने करण्यात मग्शुल आहेत. उपवनसंरक्षक हे ग्रीन आर्मीचे सदस्य वाढविणे ऐवढेच फक्त वनविभागाचे कार्य आहे, अशा भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
---
टायगरसेलची बैठक नाही
गेल्या अडीच वर्षांपासून वनविभाग व पोलिस, एसटी यासह इतर प्रशासनाची एकत्रित टायगरसेल बैठक गेल्या अडीच वर्षापासून झाली नाही. प्रत्यक्षात किमान दोन महिन्यांनी एकदा बैठक झाली पाहिजे. पण, अडीच वर्षांपासून बैठका नाहीत. उपवनसंरक्षक त्या समितीचे सचिव असून तेही अनभिज्ञ आहेत, हे विशेष.
-------------

Saturday, April 22, 2017